पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यात वाद; परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येणार?

| Updated on: Jan 16, 2022 | 3:00 PM

परळीच्या राजकारणातील मुंडे बहीण-भावाच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आता नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

परळीच्या राजकारणातील मुंडे बहीण-भावाच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आता नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष सुरु आहे. या संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव आणि प्रशासक नेमण्यासाठी 4 जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल विद्यापीठाकडे सादर करणार आहे. समितीने एकदा चौकशी केल्यानंतर 15 जानेवारी नंतर पुन्हा चौकशी करणार आहेत. दरम्यान मुंडे बहीण-भावाच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 16, 2022 11:03 AM
Video | अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर की मुंबईमध्ये होणार ?
Mumbai | मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांसाठी रेल्वेचं महत्त्वाचं आवाहन