Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या, ‘वैद्यनाथ साखर कारखाना आता…’

| Updated on: Nov 13, 2024 | 1:25 PM

दुष्काळातील आर्थिक संकटात सापडलेला पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना बंद झाला होता. मात्र पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखान्यासंदर्भात. स्वतः जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी एक गुड न्यूज देली आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

दुष्काळातील आर्थिक संकटात सापडलेला पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात बोलत असताना स्वतः पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये असलेल्या जाहीर सभेतून कारखान्याबाबत गुड न्यूज दिली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजित सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याची उभारणी केली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याचे सूत्र पंकजा मुंडे यांनी हाती घेतले होते. मात्र मध्यंतरी दुष्काळादरम्यान आर्थिक संकटात वैद्यनाथ साखर कारखाना सापडला आणि हा कारखाना बंद होता. परंतु अखेर हा वैद्यनाथ साखर कारखाना पुन्हा सुरू होणार असल्याची आनंदाची बातमी पंकजा मुंडे यांनी दिली आहे. येत्या 14 तारखेला वैद्यनाथ साखर कारखाना सुरु होणार आहे आणि 25 तारखेला मोळी टाकण्याचं काम होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या उसाची काळजी करू नये, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 13, 2024 01:25 PM
‘संजय राऊतांच्या अंगात आल्यानं मविआचं सरकार बनलं अन्…’, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य
Supriya Sule : ‘आप को जवाब देना पडेगा…’, सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांवर केस करणार? प्रकरण नेमकं काय?