आई प्रचारसभेत सांगायची, मुंडेसाहेबांचं चिन्ह कमळ अन् ही आमची पंकजा, भाजपसोबतचं नातं असं सांगितलं पंकजांनी!

| Updated on: Jan 29, 2022 | 8:31 PM

लहानपणी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचार सभेच्या वेळची आठवण सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या प्रचारसभेत मी आईच्या कडेवर असायचे. सभेसाठी जमलेल्या लोकांना आई सांगायची, मुंडे साहेब यांचं चिन्ह कमळ आहे आणि ही आमची मुलगी पंकजा.

बीडः भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या घराण्यात आणि आपल्या व्यक्तीमत्त्वाशी भाजपचे नाते किती जुने आहे, याबद्दल भावना व्यक्त केल्या. बीडमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांनी भाजप (BJP) आणि कमळाशी त्यांचे नाते किती जवळचे आहे, याबद्दल आज प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी नऊ महिन्यांची होते, तेव्हापासून मुंडेसाहेब प्रचारावेळी मला सोबत घेऊन जायचे. तेव्हा माझी आई मला कडेवर घेऊन जायची, अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमात बोलताना जागवल्या.

नागपूरच्या रँचोची कमाल, भंगार वापरुन बनवली रेसिंग कार
Special Report | अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सिताराम कुंटेचा ईडीकडे जबाब, सूत्रांची माहिती