Breaking | बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचे राजीनामे, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्याचांही राजीनामा

| Updated on: Jul 10, 2021 | 8:27 PM

केंद्रीय मंत्री मंडळात खा. प्रीतम मुंडे यांना सामावून घेतलं नसल्याने नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदाचा राजीनामा सत्र सुरू केला आहे.  भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.

केंद्रीय मंत्री मंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना सामावून घेतलं नसल्याने नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदाचा राजीनामा सत्र सुरू केला आहे.  भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असला तरी या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बीडमधील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा एकूण 14 जणांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.

Published on: Jul 10, 2021 04:12 PM
जरंडेश्वरच्या कर्ज प्रकरणाची चौकशी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस
Video | ‘देवा पाऊस येऊ दे’ शेतकर्‍यांसाठी कृषिमंत्री दादा भुसे यांचे परमेश्वराला साकडे