Pankaja Munde Uncut | पंकजा मुंडेंनी ते ट्विट का केलं? नाराजीच्या बातम्या फेटाळल्या, पंकजा मुंडेची संपूर्ण पत्रकार परिषद

| Updated on: Jul 09, 2021 | 3:51 PM

मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं सांगत पंकजा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं. 

मुंबई: प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं सांगत पंकजा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं. केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते. त्यामुळे आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही.

पुणेकरांना 10 रुपयात गारेगार प्रवास, पुण्यात वातानुकूलित मिनी बसचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
Mumbai | मुंबईत 3 महिन्याच्या चिमुरडीची हत्या, मुंबईच्या कफ परेडमधला धक्कादायक प्रकार