Pankaja Munde | पंकजा मुंडेंकडे मध्यप्रदेशाची जबाबदारी, विधानसभा, लोकसभेचा प्रचार करणार

| Updated on: Oct 19, 2021 | 1:25 PM

 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना मध्यप्रदेशचं प्रभारी करण्यात आलं असून त्या मध्यप्रदेशातील विधानसभा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार करणार आहेत.

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना मध्यप्रदेशचं प्रभारी करण्यात आलं असून त्या मध्यप्रदेशातील विधानसभा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार करणार आहेत. राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर पंकजा यांच्याकडे पहिल्यांदाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या दिल्लीत आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. निवडणुका लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी मध्यप्रदेशची प्रभारी आहे. मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात निवडणूक सुरू आहे. तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे.

Pune | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 19 October 2021