Parbhani Corona | परभणीत एका विद्यार्थाला कोरोना, शाळा आठवडाभर बंद
राज्यभरात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असतांना परभणी जिल्ह्यातील एक शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 1 आठवड्यासाठी बंद करावी लागली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मानवत शहरातील गर्दीचे ठिकाणे 16 ऑक्टोबर पर्यन्त बंद केले असताना आता पूर्णा तालुक्यातील गौर गावातील सोमेश्वर माध्यमिक विद्यालय 1 आठवड्यासाठी बंद करण्यात आले आहे.
राज्यभरात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असतांना परभणी जिल्ह्यातील एक शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 1 आठवड्यासाठी बंद करावी लागली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मानवत शहरातील गर्दीचे ठिकाणे 16 ऑक्टोबर पर्यन्त बंद केले असताना आता पूर्णा तालुक्यातील गौर गावातील सोमेश्वर माध्यमिक विद्यालय 1 आठवड्यासाठी बंद करण्यात आले आहे. या विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक अश्या 69 जणांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्या होत्या. त्यात आठवीचा एक विद्यार्थी कोरोना पॉसिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 1 आठवड्यासाठी सदर शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली आहे.