पालकांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला, काय झाली चर्चा?
VIDEO | पालकांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला, काय केली मागणी?
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आज पालकांचे शिष्टमंडळ भेटीला आले होते. या शिष्टमंडळाने मुंबईतील राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी भेट घेतली. यावेळी पालकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत पेपर सोडवण्याचा वेळ वाढवावी अशी मागणी केली. गेली दोन वर्ष कोरोना महामारी काळात ऑनलाईन परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेचा सराव राहिला नाही आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सराव परिक्षेत दिसून आला आहे. गुणांची टक्केवारी कमालीची घसरत असल्याचे पालकांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, आज लेखिका अनिता पाध्ये यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणीच हे प्रकाशन करण्यात आले.
Published on: Feb 14, 2023 03:41 PM