क्या बात है… हरियाणा सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र तरी…

| Updated on: Aug 08, 2024 | 6:01 PM

Vinesh Phogat Retirement : सैनीने ट्विटर असे सांगितले की, "हरियाणातील आमची धाडसी मुलगी विनेश फोगटने चमकदार कामगिरी केली आणि ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ती काही कारणांमुळे फायनलमध्ये भाग घेऊ शकली नाही पण ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे."

हरियाणा सरकार महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिचं मेडलिस्टसारखंच स्वागत करणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांनी विनेश फोगटचं जंगी स्वागत करणार असल्याची माहिती दिली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल विज यांनी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित केल्याबद्दल आणि निवृत्तीबद्दल वक्तव्य केले आहे. चंदिगडमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, आम्ही विनेश फोगटला रौप्य पदकाप्रमाणे सुविधा देऊ. हरियाणा सरकार विनेश फोगटला पदकविजेते म्हणून सन्मानित करणार आहे आणि राज्य सरकार ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्यांना जे बक्षीस देते तेच पुरस्कार म्हणून फोगटला देणार आहे. बुधवारी, 50 किलो गटात सुवर्णपदकाच्या अंतिन सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे फोगटला ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले.

Published on: Aug 08, 2024 06:01 PM
भाजप आमदाराच्या नावानं चिठ्ठी अन् तरूणाची आत्महत्या, चिठ्ठीत जे काही म्हटलं त्यानं उडाली खळबळ
Paris Olympics 2024 : विनेश फोगटची अपात्रता कायम राहणार की पदक मिळणार? CAS कोर्ट काय देणार निकाल?