लोकभेतील घुसखोरीचा कट दीड वर्षांपूर्वीच! ५ अटकेत १ फरार; मास्टरमाईंड कोण? बघा EXCLUSIVE रिपोर्ट
संसदेत घुसखोरी करणाऱ्या ५ तरूणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा मास्टरमाईंड राजस्थानचा ललित झाँ आहे. लोकसभा आणि संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडून धुडगूस घातल्यानंतर इतर आरोपींचे फोन घेऊन तो फरार झालाय. आतापर्यंत ६ जणांचे नावं समोर आले असून ते अटकेत
मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : कडेकोड सुरक्षा असलेल्या संसदेत घुसखोरी झाली. ज्यामध्ये महाराष्ट्रातील लातूरच्या अमोल शिंदे यांचाही समावेश असून सध्या तो अटकेत आहे. पोलीस तपासातून नवनवीन खुलासे समोर येतायंत. संसदेत झालेल्या घुसखोरीचा कट दीड वर्षांपूर्वीच रचण्यात आला होता अशी माहिती समोर येतेय. संसदेत घुसखोरी करणाऱ्या ५ तरूणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा मास्टरमाईंड राजस्थानचा ललित झाँ आहे. लोकसभा आणि संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडून धुडगूस घातल्यानंतर इतर आरोपींचे फोन घेऊन तो फरार झालाय. आतापर्यंत ६ जणांचे नावं समोर आले असून ते अटकेत आहेत. आरोपींना अटक झाल्यानंतर एकएक माहिती समोर येतेय. १३ डिसेंबरची तारीख मुद्दाम नियोजनपूर्वक ठरवली कारण याच दिवशी २००१ ला दहशतवादी हल्ला झाला होता. लोकसभेत घुसखोरीचा कट दीड वर्षांपूर्वी कसा रचण्यात आला बघा स्पेशल रिपोर्ट