संसदेची सुरक्षा भेदली, ‘त्या’ दोघांच्या लोकसभेत उड्या अन् स्मोक कँडलचा धूर; उद्देश नेमका काय होता?
संसदेची सुरक्षा भेदून दोन जणांनी लोकसभेच्या भर कामकाजात लोकसभेत घुसखोरी करत उड्या घेतल्या. यामध्ये महाराष्ट्रातील एका तरूणाचा समावेश आहे. ठीक १ वाजून १ मिनिटांनी संसदेचं कामकाज सुरू असताना एकच गदारोळ केला. नेमकं काय घडलं बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १४ डिसेंबर २०२३ : संसदेची सुरक्षा भेदून दोन जणांनी लोकसभेच्या भर कामकाजात लोकसभेत घुसखोरी करत उड्या घेतल्या. यामध्ये महाराष्ट्रातील एका तरूणाचा समावेश आहे. ठीक १ वाजून १ मिनिटांनी संसदेचं कामकाज सुरू असताना सागर शर्मा नावाच्या तरूणाने उडी घेतली. त्यानंतर मनोरंजन नावाच्या तरूणाने प्रेक्षक गॅलरी उडी मारली आणि या दोघांनी उड्या मारत अध्यक्षांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र खासदारांनी घेराव घालताच या दोघांनी स्मोक कँडलने लोकसभेत धूर केला. लोकसभेत या दोघांचा धुडगूस सुरु होता तर बाहेर दोघे होते त्यापैकी एकाचं महाराष्ट्र कनेक्शन आहे. एक लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे तर दुसरी हरियाणाची निलम सिंह…या दोघांनी स्मोक कँडलचा वापर करत घोषणाबाजी केली. तानाशाही नही चलेंगी, भारत माता की जय म्हणत असताना पोलिसांनी या दोघांना अटक केली. बघा कोण आहे नेमका अमोल शिंदे?