लोकसभेतील गदारोळाचं महाराष्ट्र कनेक्शन; संसदेत शिरकाव करणारा अमोल शिंदे आहे तरी कोण?
संसदेतील या गोंधळाचं कनेक्शन महाराष्ट्राशी असल्याचे समोर आले आहे. गोंधळ घालणारी व्यक्ती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. या तरूणाचं नाव अमोल शिंदे असे असून त्याला लोकसभेबाहेरून पोलिसांनी अटक केले आहे.
मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : संसदेतील कामकाज सुरू असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेतल्या आणि या दोन व्यक्तींनी संसद परिसरात एकच गोंधळ घातला. या दोघांनी आधी संसदेबाहेर घोषणाबाजी केली तर काही फटाके फोडले. ज्या लोकांनी गोंधळ घातला. ते मैसूरचे प्रतापराव सिंह खासदाराच्या पासवर हे लोक संसदेत आले होते. तर मध्यप्रदेशमधील खासदारांच्या मदतीने हे पास बनवण्यात आले असल्याची माहिती मिळतेय. या घटनेने अवघ्या भारताला हादरवून सोडले. आता संसदेतील या गोंधळाचं कनेक्शन महाराष्ट्राशी असल्याचे समोर आले आहे. गोंधळ घालणारी व्यक्ती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. या तरूणाचं नाव अमोल शिंदे असे असून त्याला लोकसभेबाहेरून पोलिसांनी अटक केले आहे. अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. अमोल शिंदे यांचे आई-वडील मजूर असल्याची माहिती मिळतेय. तर हा महाविद्यालयात शिकत असल्यापासून घरी राहण्यास नव्हता.