Special Report | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून आपल्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केलाचा पलटवार निलेश लंके यांनी केलाय.

तर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप ऐकली आणि मन सुन्न झालं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.