पवार कुटुंब एकाच मंचावर…पण ताई-दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं

| Updated on: Mar 03, 2024 | 11:03 AM

नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पवार कुटुंब एकाच मंचावर होते. यावेळचा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दुरावा फक्त बारामतीकरांनी अनुभवला असं नाही. तर मिडीयाच्या माध्यमातून ताई-दादाचा हा दुरावा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला.

मुंबई, ३ मार्च २०२४ : नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पवार कुटुंब एकाच मंचावर होते. मात्र सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी बोलणं काय पाहणं सुद्धा टाळलंय. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दुरावा फक्त बारामतीकरांनी अनुभवला असं नाही. तर मिडीयाच्या माध्यमातून ताई-दादाचा हा दुरावा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. पवारांच्या बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा झाला. या कार्यक्रमाच्या मंचावर सुरूवातीला सुप्रिया सुळे आल्यात त्यांनी यावेळी उपस्थितांना नमस्कार केला. यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एन्ट्री झाली असता सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. अजित पावर अगदी त्यांच्या बाजूला होते, पण त्यांनी ताईंकडे न पाहता उपस्थितांसमोर हात उंचावले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या मागून जात त्यांनी फडणवीसांना नमस्कार केला. बघा मंचावर नेमकं काय होतं चित्र…..

Published on: Mar 03, 2024 11:03 AM
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे… काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाला कुठं कोणती जागा?
जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी; रामदास कदम संतापले अन् म्हणाले, ‘सर्व पक्षांना संपवून भाजपला फक्त…’