Sharad Pawar : ‘त्या’ दोन नेत्यांमधले मतभेद पवारांनी 15 मिनिटांमध्ये दूर केले, नेमका वाद काय ?

| Updated on: Sep 18, 2022 | 10:32 PM

पुणे येथे शरद पवार यांनी जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांचीच बैठक घेऊन हे मतभेद मिटवले आहे. विरोधी पक्षनेतेपद अजित पवारांकडे आणि इतर मुद्द्यांवरुन त्यांच्यामध्ये मतभेद होते.

पुणे : (Political Party) राजकीय पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप एवढेच सुरु आहे असे नाही तर अंतर्गत मतभेदही कायम राहिलेले आहे. (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादी कॉंग्रेसने अंतर्गत मतभेद हे आतापर्यंत वेळीच मिटवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये मतभेद सुरु होते. दिल्ली येथील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते अधिक तीव्रतेने समोरही आले. निमित्त होत ते अधिवेशनात अजित पवार यांना बोलू न दिल्याचे. यानंतर दोन्ही नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले. मात्र, त्यानंतर आता सर्वेसर्वा शरद पवार यांनीच हे मतभेद दूर केल्याची चर्चा आहे. पुणे येथे शरद पवार यांनी जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांचीच बैठक घेऊन हे मतभेद मिटवले आहे. विरोधी पक्षनेतेपद अजित पवारांकडे आणि इतर मुद्द्यांवरुन त्यांच्यामध्ये मतभेद असल्याचे समोर आले होते. पण पवारांनी ते 15 मिनिटांमध्ये दूर केले आहेत. तर या दोघांमध्ये असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पैठण येथील सभेत सांगितले होते.

Published on: Sep 18, 2022 10:32 PM
राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचे संकेत
चंदीगड विद्यापीठातलं शैक्षणिक वर्तुळ हादरलं, विद्यापीठातल्या स्कॅंडलचा सूत्रधार कोण?