‘या’ शहरात महिलेच्या वेशात माणसासारखी चालणारी ‘ही’ व्यक्ती कोण?
काल रात्री 3 ते 4च्या दरम्यान इंदिरानगर परिसरातील रुचिका जनरल स्टोअर्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा मनोरुग्ण आढळून आला असून अद्यापही हा मनोरुग्ण परिसरात मोकाट आहे.
मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मालेगाव: नाशिक (nashik) जिल्ह्यातील मालेगाव येथील सोयगावमधील लोक सध्या एका विचित्र दहशतीखाली आहेत. ही दहशत वाघाची (tiger) किंवा बिबट्याची नाही किंवा इतर कशाचीही नाही. ही दहशत आहे, एका मनोविकृताची. हा मनोविकृत (psychotic) दिवसा काहीच करत नाही. दिवसा कुठे असतो ते माहीत नाही. मात्र, रात्र होताच त्याचा संचार सुरू होतो. रात्री तो महिलांचे कपडे घालून अन् तोंडाला कपडा बांधून सुनसान रस्त्यावरून फिरत असतो. त्यामुळे तो या कपड्यात भुतासारखा दिसत असल्याने लोक धास्तावले आहेत. सोयगावमधील विठ्ठल नगर, जिभाऊ नगर, इंदिरा नगर, पारिजात कॉलनी, डि.के.चौक परिसरात महिलांचे कपडे परिधान करून हा मनोविकृत नागरिकांना भयभीत करत आहे. पहाटे 3 ते 6 च्या दरम्यान या मनोविकृताचा रस्त्यावर मुक्त संचार असतो. त्याच्या या दहशतीला अनेकजण बळी पडले आहेत. काल रात्री 3 ते 4च्या दरम्यान इंदिरानगर परिसरातील रुचिका जनरल स्टोअर्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा मनोरुग्ण आढळून आला असून अद्यापही हा मनोरुग्ण परिसरात मोकाट आहे. त्याचा ठावठिकाणा कुणालाच माहीत नसल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. तर नागरिक दहशतीमुळे रात्रीचं घराबाहेर पडणं टाळत आहेत.