लोकांना रस्त्यावर सापडताय 500 रूपयांच्या नोटा, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पैसे दिसल्याने चर्चांना उधाण

| Updated on: Oct 31, 2024 | 12:35 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना अलिबाग तालुक्यामधील गोंधळपाडा रस्तावर पैसे पडल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यात पैसे सापडण्याच्या घटनेला विशेष महत्त्व आलंय.

Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असताना अलिबाग तालुक्यामधील गोंधळपाडा रस्त्यावर पैशांचा पाऊस पडल्याची माहिती समोर येत आहे. अलिबागमधील गोंधळपाडा रस्त्यावर नागरिकांना पैसे सापडले आहेत. हे रस्त्यावर पडलेले पैसे लोकांनी उचलून नेलेत. येथील स्थानिकांना पाचशे रूपयांच्या नोटा रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे सापडल्याने चर्चांना जोरदार उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रस्त्यांवर पडलेले पैसे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्त्यावर पडलेल्या नोटा आणि पैशांचे बंडल पाहून अनेक नागरिकांनी हात साफ केला आणि पडलेले पैसे उचलून तेथून पसार झाले. तर काही जागृक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देत हे रस्त्यावरील पैसे पोलिसांच्या ताब्यात दिलेत.