Special Report | ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण?
नियम शिथील केल्यामुळे नागरिक कोरोना आता नाहीसा झाला आहे, या अविर्भावातच घराबाहेर पडून गर्दी करत आहेत. लोकांच्या अशा वागण्याने, नियमांचं पालन न केल्याने आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच देत आहोत.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु हे नियम शिथील केल्यामुळे नागरिक कोरोना आता नाहीसा झाला आहे, या अविर्भावातच घराबाहेर पडून गर्दी करत आहेत. लोकांच्या अशा वागण्याने, नियमांचं पालन न केल्याने आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच देत आहोत.
(People not following social distancing rules, Invitation for third wave of Corona?)
Published on: Jun 14, 2021 09:45 PM