पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत कधी सेल्फी काढलाय? एकदा व्हिडीओ बघा, तुम्हीही म्हणाल…
चक्क एका मोराला लोकांचा लळा लागल्याचे पाहायला मिळाले. या मोराच्या आजूबाजूला अनेक लोकांचा गराडा असतानाही हा मोर लोकांसोबत तासनतास रमताना दिसत आहे. पण हे नेमकं कुठं घडतंय... तुम्ही कधी काढलाय का या लोकांसारखा सेल्फी?
पाळीव प्राण्यांना, पक्षांना आपल्या मालकांचा लळा लागलेले अनेक प्रसंग तुम्ही पाहिले आणि ऐकले असतील. पण साताऱ्यात चक्क एका मोराला लोकांचा लळा लागल्याचे पाहायला मिळाले. साताऱ्यात चक्क एका जंगलातील पिसारा फुलवलेल्या मोरासोबत कोणी सेल्फी घेतंय तर कोणी त्याचे फोटोसेशन करतंय. तर कोणी या मोराच्या आकर्षक अशा रूपाकडे पाहत बसले आहे. एवढेच नाहीतर या मोराच्या आजूबाजूला अनेक लोकांचा गराडा असतानाही हा मोर लोकांसोबत तासनतास रमताना दिसत आहे. पण हे नेमकं कुठं घडतंय… साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याचा उंटाची मान भागात अनेक लोक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. अशाच एका ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून दररोज एक मोर सकाळी 7.30 वाजता येतो आणि आपला पिसारा फुलवून लोकांचे लक्ष वेधून घेतोय. अनेक अबालवृद्ध या मोराचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी या ठिकाणी आधीच जमलेले असतात. मग काय पिसारा फुललेल्या या मोरासोबत सगळेच रमून जातात. तब्बत एक तास हा मोर सर्वांसोबत या ठिकाणी थांबतो, नंतर पुन्हा जंगलात निघून जातो. मात्र रोज त्याच वेळी पुन्हा त्याच ठिकाणी आपली हजेरी देखील लावतो आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. तुम्ही कधी काढलाय का या लोकांसारखा सेल्फी?