Mumbai | गणेश मंडळांच्या 4 फुटांच्या मूत्तीसाठी परवानगी
मोठ्या मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जनस्थळी ( चौपट्यावर ) विसर्जन करता येणार आहे. तसेच ठराविक कार्यकर्त्यांसह हे विसर्जन करता येणार असून, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, असंही बैठकीत ठरलंय.
मुंबईः येत्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून, अनेकांनी आतापासून लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी केलीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेशोत्सव मंडळांनीही चार फुटांची मूर्ती आणण्याची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे मुंबई महापालिका आणि गणेश मंडळे यांच्यात एक बैठक झालीय. या बैठकीत सर्व मंडळे चार फुटांची मूर्ती आणणार असल्याचं ठरवण्यात आलंय. मोठ्या मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जनस्थळी ( चौपट्यावर ) विसर्जन करता येणार आहे. तसेच ठराविक कार्यकर्त्यांसह हे विसर्जन करता येणार असून, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, असंही बैठकीत ठरलंय. कोरोनाच्या संकटापायी यंदासुद्धा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना असल्याने नियमांचं पालन करावं लागणार आहे. चौपट्यांवर मोठ्या मंडळांना गणपती विसर्जन करता येणार आहे. यावेळी फक्त 10 कार्यकर्ते असतील, कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही.