Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ विरोधात अनिल वडपल्लीवार यांची याचिका, कोर्टानं काय दिले निर्देश?
अनिल वडपल्लीवार यांच्या पोलीस सुरक्षेबाबत कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. काय आहे नेमकं प्रकरण बघा व्हिडीओ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविरोधात अनिल वडपल्लीवार यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला विरोध केल्यामुळे आपल्याला सुरक्षा मिळावी म्हणून अनिल वडपल्लीवार यांनी पोलीस आयुक्तांना अर्ज केला होता. मात्र पोलिसांकडून कोणताही निर्णय न घेतला गेल्याने अनिल वडपल्लीवार यांनी कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेवर कोर्टाने सुनावणी घेत कायद्यानुसार निर्णय घ्या, असे निर्देश कोर्टाकडून अनिल वडपल्लीवार यांच्या याचिकेवर देण्यात आले आहेत. मोफतच्या योजना बंद करुन मुलभूत प्रश्नांवर पैसा खर्च करावा. यासाठी नागपूरचे रहिवाशी अनिल वडपल्लीवारांनी हायकोर्टात याचिका केल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, अनिल वडपल्लीवार हे काँग्रेस समर्थक असून पटोले आणि सुनिल केदारांचे निकटवर्तीय आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक दावा केला होता. या दाव्यानुसार अनिल वडपल्लीवार यांचा काँग्रेसशी कोणत्याही पातळीवर संबंध नसून ते काँग्रेसचे सदस्य सुद्धा नाहीत, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.