Mumbai | मुंबईत इंधन दरात वाढ ; पेट्रोल 106.93 रुपयांवर तर डिझेल 97.46 रुपये लिटर
देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये साधारण 30 ते 39 पैसे आणि डिझेलच्या दरात 24 ते 32 पैशांची वाढ झाली.
एका दिवसाच्या स्थिरतेनंतर शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये साधारण 30 ते 39 पैसे आणि डिझेलच्या दरात 24 ते 32 पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी (Petrol rate) 106.93 आणि प्रतिलिटर डिझेलसाठी 97.46 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी बुधवार आणि गुरुवारी इंधनाच्या दरात वाढ होताना पाहायला मिळाली होती. त्यानंतर कालच्या दिवसात इंधनाचे दर स्थिर होते. (Petrol and Diesel Price Rates Today 10 July 2017)