मुंबईत सलग दहाव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ
मुंबईत सलग दहाव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत दरवाढ पाहायला मिळत आहे. आज सलग 10व्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. आज मुंबईत पेट्रोलची किंमत 112 रूपये 11 पैसे झाली.
मुंबई : मुंबईत सलग दहाव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत दरवाढ पाहायला मिळत आहे. आज सलग 10व्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. आज मुंबईत पेट्रोलची किंमत 112 रूपये 11 पैसे झाली. डिझेलचा दर प्रति लिटर 102.89 पैसे आहे. आता पेट्रोल 34 पैशांनी महाग झाले आहे. तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. पावर पेट्रोल 116.02 पैसे आहे. पेट्रोल 130 रुपये प्रती लिटरपर्यंत जाऊ शकते असं बोलले जात आहे. महामारीच्या काळात सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडत चालले आहे.