फोन टॅपिंग प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक पदी

| Updated on: Jan 04, 2024 | 6:46 PM

वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकृत घोषणेनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ठरल्या आहेत.

Follow us on

मुंबई, ४ जानेवारी, २०२४ : फोन टॅपिंग प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झालेल्या या अधिकृत घोषणेनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ठरल्या आहेत. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केले आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी रश्मी शुक्ला यांच्यावर असल्याने त्यांच्यावर दोन FIR नोंदवण्यात आले होते.