छत्रपती संभाजीनगरमध्ये छगन भुजबळ यांच्या फोटाला कुणी घातला दुग्धाभिषेक? बघा व्हिडीओ

| Updated on: Nov 20, 2023 | 12:58 PM

मराठा कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांना वारंवार विरोध केला जात असताना दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या फोटोला ओबीसी कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक घालण्यात येतोय. यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना समर्थन करणाऱ्या घोषणाही दिल्यात.

छत्रपती संभाजीनगर, २० नोव्हेंबर २०२३ : छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या फोटोला हा दुग्धाभिषेक घातला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार पक्का असल्याचे पाहायला मिळत आहे. तर येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत जरांगे पाटील हे राज्यव्यापी दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाक् युद्ध रंगल्याचे गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. एकीकडे मराठा कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांना वारंवार विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या फोटोला ओबीसी कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक घालण्यात येतोय. यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना समर्थन करणाऱ्या घोषणाही दिल्यात.

Published on: Nov 20, 2023 12:58 PM
Vijay Wadettiwar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर…, विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
मर्दाच्या हातात भगवा शोभतो, ती ताकद संजय राऊत यांच्यात आहे का? कुणी केला सवाल?