कुठे बैठका, कुठे जाहीर सभा, तर कुठे रोड शो; पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि युतीचे नेते आज प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पाहा...
पिंपरी चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि युतीचे नेते आज प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात बैठक घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे. तसंच ते जाहीर सभाही घेणार आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जाहीर सभा घेणार आहेत. तसंच भाजपचे नेते आशिष शेलार आणि चित्रा वाघ हे देखील प्रचारासाठी आज मैदानात आहेत. यासह इतरही नेते या पोटनिवडणुकीचा प्रचार करणार आहेत.