Pune Gas Cyclinder Blast | गॅस चोरी करताना झाला नऊ टाक्यांचा भीषण स्फोट अन्, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 09, 2023 | 1:31 PM

VIDEO | पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी भीषण आग लागली. गॅस चोरीच्या काळाबजाराने ही भीषण आग लागल्याचं धक्कादायक कारण समोर आलं. शहरात गॅस चोरीच्या काळाबाजार करताना भीषण आग, गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला, कसा घडला धक्कादायक प्रकार?

पुणे, ९ ऑक्टोबर २०२३ | पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी भीषण आग लागली. गॅस चोरीच्या काळाबजाराने ही भीषण आग लागल्याचं धक्कादायक कारण समोर आलेलं आहे. एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला आहे. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी इथून पळ काढला. बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशी देखील वास्तव्यास होते. मात्र या आगीच्या कचाट्यात ते आले नाहीत हे मोठं सुदैव मानवं जात आहे, मात्र शाळेतील तीन वाहनं यात जळून खाक झालीत. रविवारी रात्री पावणे अकरा वाजता लागलेली आग पावणे बाराच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली. पण गॅसच्या टाक्यांवरील कुलिंग ऑपरेशनला पुढचा तासभर तरी लागला. दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं आणि टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोध ही सुरू आहे.

Published on: Oct 09, 2023 01:31 PM
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
Ravikant Tupkar थेट म्हणले, … तर शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही