Video : भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी
BJP MLA Mahesh Landage Death threats : भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी; पाहा नेमकं काय घडलंय...
पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 30 लाखांची खंडणी मागत महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नागरिकांसाठी असलेल्या परिवर्तन हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून 30 लाखाची खंडणी दे अन्यथा जीवाला धोका आहे, असा मेसेज पाठवण्यात आला. त्या मॅसेजमध्ये बँक डिटेल्स् देखील देण्यात आल्या आहे. हा मेसेज महेश लांडगे यांना आल्याने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात खंडणीखोराविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Published on: Apr 06, 2023 10:23 AM