Pink Polling Booth : गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?

| Updated on: Apr 19, 2024 | 1:42 PM

पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेत गडचिरोली येथे गुलाबी मतदान केंद्र उभारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या गुलाबी मतदान केंद्रातील संपूर्ण कारभार हा महिलांच्या हाती सोपावण्यात आलाय. त्यामुळे या मतदान केंद्रावर वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या या मतदान केंद्राची चांगलीच चर्चा होतेय.

देशभरासह महाराष्ट्रातही लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान आज सुरू झाले आहे. अशातच पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेत गडचिरोली येथे गुलाबी मतदान केंद्र उभारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या गुलाबी मतदान केंद्रातील संपूर्ण कारभार हा महिलांच्या हाती सोपावण्यात आलाय. त्यामुळे या मतदान केंद्रावर वेगळं चित्र पाहायला मिळत असून महिलांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. पिंक पोलिंग सेंटर म्हणजे गुलाबी मतदान केंद्र. या मतदान केंद्रावर मतदान पथकात मतदान कर्मचारी आणि सुरक्षा देणारे पोलीस महिला हा मतदान केंद्राच्या कार्यभार सांभाळत आहेत. एक महिलांसाठी जागृती देण्यासाठी हे मतदान केंद्र जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात १६ लाख १९ हजार ६९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८ लाख १४ हजार ६३ पुरुष तर ८ लाख २ हजार ४३४ स्त्रिया आणि १० तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.

Published on: Apr 19, 2024 01:42 PM
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, ‘त्या’ नवदेवाची होतेय चर्चा
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांनी आपला हक्क बजावत केलं मतदरांना आवाहन