Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदींनी कुणाच्या हस्ते सोडला 11 दिवसांचा उपवास?
विधी पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ दिवस केलेला उपवास महंत गोविंद देव गिरी यांच्या हस्ते सोडला. महंत गोविंद देव गिरी यांनी मंचावरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. प्राणप्रतिष्ठापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी11 दिवस उपवास केला. मोदींनी दिवसातून फक्त दोनदा नारळ पाणी घेतल्याचेही त्यांनी सांगितले
अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : ज्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचं वचन दिलं होतं त्याच ठिकाणी अखेर ते सत्यात अवतरलं आहे. अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा मोदींच्या हस्ते झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत समाजाच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक विधी पार पडला. यावेळी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा विधी पूर्ण करण्यात आला. विधी पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ दिवस केलेला उपवास महंत गोविंद देव गिरी यांच्या हस्ते सोडला. महंत गोविंद देव गिरी यांनी मंचावरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. प्राणप्रतिष्ठापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवस उपवास केला. मोदींनी दिवसातून फक्त दोनदा नारळ पाणी घेतले. तर या उपवासारम्यान मोदींनी देशातील अनेक मंदिरांना भेटी देऊन तेथे पूजाही केल्याचेही महंत गोविंद देव गिरी यांनी सांगितले.