One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

| Updated on: Sep 18, 2024 | 4:11 PM

एनडीएच्या जाहीरनाम्यात ‘एक देश एक निवडणूक’ हा मुद्दा होता. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात ‘एक देश एक निवडणूक’ यावर चर्चा होत होती. दरम्यान, सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची समिती नेमली होती. या समितीने दिलेला अहवाल बुधवारी मंजूर करण्यात आला असून समितीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत अनुकूल अहवाल सादर केला होता.

Follow us on

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एक देश एक निवडणूक असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारीच एक देश एक निवडणूक याबाबतचे वक्तव्य केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाने त्यांच्या जाहीरनाम्यातील महत्वाचा विषयाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ज्या दिवशी १०० दिवस पूर्ण झाले होते. त्या दिवसापासून केंद्रात मोठ्या हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या दोन आठवड्यापासून एक देश एक निवडणूक असा प्रस्ताव मंजूर कऱण्यासाठी यंत्रणा कार्यरत होत्या. दरम्यान, आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एक देश एक निवडणूक प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा कायदा कधीपासून लागू होईल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.