PM Modi VIDEO : ‘सुरतचं जेवण आणि काशीचं मरण…’, युद्धनौका देशाला समर्पित केल्यानंतर मोदी नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jan 15, 2025 | 1:23 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबई डॉकवर तीन नौदल आघाडीच्या लढाऊ जहाजे देशाला समर्पित केलेत. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भारत एक प्रमुख सागरी शक्ती बनण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबई डॉकवर तीन नौदल आघाडीच्या लढाऊ जहाजे देशाला समर्पित केलेत. यामध्ये दोन युद्धनौका आणि पाणबुडींचा समावेश आहे. ज्यांची नावं आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर अशी आहेत. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भारत एक प्रमुख सागरी शक्ती बनण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले. नौदल सुरक्षा जहाज इंडस्ट्रीमध्ये आपला एक समृद्ध इतिहास आहे. आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक मेजर मेरीटाइम पावर बनत आहे. आज जे प्लॅटफॉर्म लॉन्च झालेत, त्यात याची झलक असल्याचेबी मोदी यांनी म्हटले. इतकंच नाहीतर भारत ग्लोबल साऊथमध्ये जबाबदार सहकारी म्हणून ओळखला जातो. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादच्या भावनेतून काम करत आहे. नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. असं म्हणत असताना त्यांनी सूरतच्या जेवणाचीही तारीफ केली. मोदी म्हणाले, नेव्हीत खाण्याची सर्वात चांगली सुविधा असते. आता सूरत शीप जोडला गेला आहे. आपल्याकडे म्हण आहे, सुरतचं जेवण आणि काशीचं मरण… सुरतचं भोजन महान असतं. आता सुरतचं जहाज लॉन्च होत आहे. त्यामुळे सुरती जेवणही या ठिकाणी ठेवलं जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Jan 15, 2025 01:23 PM
Indian Navy : मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण होणाऱ्या INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजांची जाणून घ्या वैशिष्ट्ये
Suresh Dhas Video : ‘…अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल’, सुरेश धसांचा अजित पवारांना खोचक टोला