भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी (LK Advani Birthday) आज सोमवारी त्यांचा 94 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी (LK Advani Birthday) आज सोमवारी त्यांचा 94 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या तसंच त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल मनोकामना व्यक्त केल्या.