PM Modi | पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी टीमशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी फोनवर संवाद साधला. या दरम्यान हॉकीपटूंचे डोळे पाणावले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्याच्या लढाऊ बाण्याची प्रशंसा केली. खेळाडूंशी फोनवर बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी फोनवर संवाद साधला. या दरम्यान हॉकीपटूंचे डोळे पाणावले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्याच्या लढाऊ बाण्याची प्रशंसा केली. खेळाडूंशी फोनवर बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. या दरम्यान खेळाडूंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, “पदक येऊ शकले नाही पण तुम्घाही गाळलेला घाम, देशाच्या करोडो मुलींची प्रेरणा बनला आहे. मी सर्व सहकाऱ्यांचे आणि तुमच्या प्रशिक्षकाचे अभिनंदन करू इच्छितो. ” दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनने 4-3 ने पराभूत केलं. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं. असं असलं तरी राणी रामपालच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सेमी फायनलपर्यंत मजल मारुन ऐतिहासिका कामगिरी केली. भारतीय महिला संघ ज्या पद्धतीने खेळला, त्याचं देशभर कौतुक होत आहे.