PM Modi Birthday | पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस बनला अधिक स्पेशल, मेट्रोमध्ये लोकांनी अशा दिल्या शुभेच्छा, बघा VIDEO
VIDEO | पंतप्रधान मोदी यांनी आज त्यांचा वाढदिवस दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत अनोख्या पद्धतीने साजरा केला. एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रो लाईनच्या उद्घाटनासाठी जात असताना त्यांनी मेट्रोतील प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी लोकांना त्यांना खास शुभेच्छा दिल्यात
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2023 | पंतप्रधान मोदी यांनी आज त्यांचा वाढदिवस दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत अनोख्या पद्धतीने साजरा केल्याचे पाहायला मिळाले. एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रो लाईनच्या उद्घाटनासाठी जात असताना त्यांनी मेट्रोतील प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी लोकांना त्यांना खास शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी ते सर्वसामान्यांसोबत मोदी मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसले. महिला आणि लहान मुले मेट्रोने प्रवास करत होती. यावेळी मोदी मुलांशी गप्पा मारताना आणि त्यांच्यावर प्रेम करताना दिसले. मेट्रोमध्ये लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने यंदा पंतप्रधानांचा वाढदिवस खूप खास बनला. मेट्रोमध्ये लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एका मुलीने खास पद्धतीने पंतप्रधानांचे अभिनंदन केले. तिने पीएम मोदींसाठी संस्कृतमध्ये गाणे गायले आहे. लोकांनी पंतप्रधानांना ‘हॅपी बर्थडे टू यू’ म्हणत अनोख्या शुभेच्छा दिल्या. बघा व्हिडिओ