PM Modi on T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मोदींनी थेट शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले…

| Updated on: Jun 30, 2024 | 11:00 AM

T20 World Cup 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर टीम इंडियाचं अभिनंदन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून "चॅम्पियन!....

भारतीय संघाने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर टीम इंडियाचं अभिनंदन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून “चॅम्पियन! आपल्या भारतीय संघाने टी-20 विश्वचषक शानदार शैलीत पुन्हा घरी आणला! आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे. हा सामना ऐतिहासिक होता.”, असे म्हटले आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले की, या शानदार विजयाबद्दल सर्व देशवासियांच्या वतीने टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन. आज 140 कोटी देशवासीयांना तुमच्या या शानदार कामगिरीचा अभिमान वाटत आहे.

Published on: Jun 30, 2024 11:00 AM
India win T20 World Cup 2024 : ‘हा माझा शेवटचा…’, T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा
T20 World Cup 2024 : आतापर्यंत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणारे ‘हे’ प्रतिभावंत भारतीय कॅप्टन्स