पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल, अजितदादांसमोरच साधला निशाणा

| Updated on: Oct 27, 2023 | 10:49 AM

tv9 Marathi Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या दौऱ्यावर होते. शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7500 कोटी रूपयांच्या विकास कामांचं लोकार्पण झालं. मात्र भाषणातून मोदी यांनी अजित पवार यांच्या समोरच शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7500 कोटी रूपयांच्या विकास कामांचं लोकार्पण झालं. मात्र भाषणातून मोदी यांनी अजित पवार यांच्या समोरच शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार केंद्रात बराच काळ कृषी मंत्री राहिले पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. शरद पवारांनी काय केलं असा सवाल करणाऱ्या मोदींनीच कृषी विभागाचा अभ्यास केला नाही, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना विरोधकांची तुलना रावणांशी केली, कितीही रावण एकत्र आले तरी मोदीच पुन्हा 2024 मध्ये पंतप्रधान होणार असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. तर महाराष्ट्रात पराभव दिसत असल्यानं महाराष्ट्रात मोदींचे दौरे वाढले, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Published on: Oct 27, 2023 10:49 AM
महायुती धर्मात रावणावरून नवं रामायण, भाजप आणि अमोल मिटकरी आमने-सामने
मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं, सदावर्ते यांचं चिथावणीखोर वक्तव्य अन् विरोधकांचा हल्लाबोल