आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; ‘वोटबँक’वरून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
'आताही धर्माच्या आधारावर बजेटचं वाटप करत आहे. धर्माच्या आधारे बजेटच्या वितरणाला मंजुरी दिली होती, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तर बजेटचे असे तुकडे करणे हे किती खतरनाक आहे. तुम्ही जाणताच आहात की काँग्रेससाठी मायनॉरिटी फक्त एकच आहे. त्यांची ती प्रिय व्होटबँक आहे'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेतून काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. काँग्रेस वोटबँकेसाठी आता बजेटचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मोदी म्हणाले, देशातील सरकारे जेवढा बजेट तयार करते. त्यातील १५ टक्के खर्च फक्त मायनॉरिटीवर केला जात आहे. म्हणजे धर्माच्या आधारे बजेटचं वाटप केलं. धर्माच्या आधारे त्यांनी देशाचे तुकडे केले. आताही धर्माच्या आधारावर बजेटचं वाटप करत आहे. धर्माच्या आधारे बजेटच्या वितरणाला मंजुरी दिली होती, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तर बजेटचे असे तुकडे करणे हे किती खतरनाक आहे. तुम्ही जाणताच आहात की काँग्रेससाठी मायनॉरिटी फक्त एकच आहे. त्यांची ती प्रिय व्होटबँक आहे. मी मुख्यमंत्री असताना जेव्हा काँग्रेसने ही गोष्ट उचलली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून त्याला विरोध केला होता. काँग्रेसला तेव्हा देशातील सर्व बजेटमधील 15 टक्के फक्त मुसलमानांवर खर्च व्हावा, असं काँग्रेसला वाटत होतं. पण भाजपच्या विरोधामुळे ते शक्य झालं नाही, असा दावा मोदींनी केला तर पण आता जुन्या अजेंड्याला लागू करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप मोदींनी केला.