Loksabha Election : राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो, कसा असणार मार्ग?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण १९ जाहीर सभा झाला. तर मुंबईमधील पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच मेगा रोड शो आहे. कसा असणार घाटकोपरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा रोड शोचा मार्ग?
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील चार टप्पे पार पडले तर आता शेवटचा टप्पा बाकी आहे. अशाच लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत मेगा रोड शो होत आहे. मुंबईतील घाटकोपर अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीजपर्यंत मोदींच्या रोड शोचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथेही सभा होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण १९ जाहीर सभा झाला. तर मुंबईमधील पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच मेगा रोड शो आहे. कसा असणार घाटकोपरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा रोड शोचा मार्ग?
Published on: May 15, 2024 05:34 PM