PM Modi on Third Wave | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मोदींची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी देशातील महत्त्वाच्या राज्यातील मुख्यमंत्र्याशी चर्चा केली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्याची संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चेवेळी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी, केंद्र सरकारनेच आता त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
Published on: Jul 16, 2021 01:40 PM