World Cup 2023 Final सामन्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचं ट्वीट… टीम इंडियाला दिल्या स्पेशल शुभेच्छा
IND vs AUS Cricket World Cup Final 2023 अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे वर्ल्ड कपचा फायनल सामना रंगणार. स्वत: नरेंद्र मोदी हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार. मात्र त्यापूर्वी या अंतिम सामन्यापूर्वीच स्वत: मोदींनी टीम इंडियासाठी टि्वट करत त्यांचा आत्मविश्वास वाढवलाय
अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३ : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम हा अंतिम टप्प्यात आलाय आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. तर आज होणाऱ्या सामन्यातील दिमाखदार आणि शानदार लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या थरारक अंतिम सामन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटरवर टीम इंडियाला शुभेच्छा देत असे म्हटले की, 140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. तुमची कामगिरी शानदार आहे, चांगले खेळा आणि खेळाडूवृत्तीची भावना कायम ठेवा, असे त्यांनी म्हणत आत्मविश्वास वाढवला आहे.
Published on: Nov 19, 2023 01:12 PM