Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता मोदींची पारंपारिक वेशभूषेत एन्ट्री
अयोध्येतील रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात पारंपारिक वेशभूषेत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार असल्याने नियमानुसार सर्व पूजा-विधी पूर्ण करण्यात आले.
अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येतील नवीन राम मंदिरात प्रभू रामल्लाच्या मूर्ती विराजमान झाली आहे. ज्या क्षणाची देशातील सर्वच राम भक्त आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आज आल्याने सर्वच जण भावूक झाले आहेत. अयोध्येतील रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात पारंपारिक वेशभूषेत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार असल्याने नियमानुसार सर्व पूजा-विधी पूर्ण करण्यात आले. मोदींनी ट्वीटरवर पोस्ट करून लिहिले, अयोध्या धाममध्ये श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा अलौकिक क्षण सर्वांना भावूक करणारा आहे. या दैवी सोहळ्याचा एक भाग होणं हे सौभाग्य आहे. मोदींनी सर्वप्रथम राम मंदिरात गणेशाची पूजा केली. तत्पूर्वी, अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पीएम मोदींचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले.