देशात पुन्हा ऑन्ली मोदी पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी… एक्झिट पोलचा अंदाज नेमका काय?

| Updated on: Jun 02, 2024 | 12:08 PM

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता येणार आहे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा २५ जागा मिळणार आहे. दरम्यान, टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार...

Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता येणार आहे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा २५ जागा मिळणार आहे. दरम्यान, टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार असून एनडीएला ३३७ जागा तर इंडिया आघाडीला १७० जागा मिळणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला २२, महाविकास आघाडीला २५ जागा आणि अपक्षला १ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. देशात मोदी आणि महाराष्ट्रात मोदी… असं चित्र एक्झिट पोलवरून स्पष्ट झालं आहे. म्हणजे केंद्रात देशाच्या जनतेची पसंती ही मोदी असल्याचे एक्झिट पोलचे आकडे सांगताय मात्र महाराष्ट्रातील चित्र काहिसं वेगळं आहे. या सर्व्हेनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला १८ शिंदे गटाला ४, अजितदादा गटाला 0 तर महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस ५, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) ६ आणि ठाकरे गटाला १४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.