Ayodhya Ram Mandir : कंठ दाटला… ऊर भरून आलं… पंतप्रधान मोदी यांचा जगन्नियंत्याला साष्टांग दंडवत
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आज १२ वाजून २९ मिनिटांनी संपन्न झाला. केवळ ४८ मिनिटांच्या मुहूर्ताच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीनंतर पंतप्रधान मोदींचा ऊर भरून आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी रामाच्या या भव्य दिव्य लोभसवाण्या मूर्ती समोर साष्टांग प्राणाम केला
अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आज १२ वाजून २९ मिनिटांनी संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतयांच्या हस्ते ही साग्रसंगीत पूजा करण्यात आली. केवळ ४८ मिनिटांच्या मुहूर्ताच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीनंतर पंतप्रधान मोदींचा ऊर भरून आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी रामाच्या या भव्य दिव्य लोभसवाण्या मूर्ती समोर साष्टांग प्राणाम केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. दरम्यान, तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत रामाचं मंदिर बनवण्याचं रामभक्ताचं स्वप्न आज अखेर पूर्ण झालं आहे. अयोध्येत सगळ्यांना जाणं शक्य नसल्याने देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभू श्री रामाचं घरबसल्या दर्शन घेतलं आणि सर्वच देशभरातील रामभक्त या सोहळ्याच्या निमित्ताने काहीसे भावनिक झाले होते.