संसदेत PM मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सभागृहात आपलं भाषण करण्यासाठी उभे राहिले अन् पहिल्यांदाच मोदींनी संसदेत बोलणंही अवघड झाल्याचे पाहायला मिळाले. नरेंद्र मोदी लोकसभा सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली, विरोधकांच्या गोंधळातच आपलं भाषण सुरू ठेवलं.
लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना पहिल्याच अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सभागृहात आपलं भाषण करण्यासाठी उभे राहिले अन् पहिल्यांदाच मोदींनी संसदेत बोलणंही अवघड झाल्याचे पाहायला मिळाले. नरेंद्र मोदी लोकसभा सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आणि एकच गोंधळ केला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही विरोधकांनी केलेल्या गोंधळावरून भडकले. विरोधकांनी नीट परिक्षेतील घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत एनडीए सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करणंही कठीण झालं. यादरम्यान ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांना चांगलंच सुनावलं. मात्र तरिही विरोधकांनी आपली घोषणाबाजी बंद केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विरोधकांच्या गोंधळातच आपलं भाषण सुरू ठेवलं.