नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद

| Updated on: Jan 23, 2022 | 7:58 PM

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती असून त्यानिमित्त या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल देण्यात येणारा नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं आहे. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच नेताजींचा भव्य पुतळा उभारला जाईल, असं आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे नेताजींनी स्वातंत्र्यासाठी कधीच इंग्रजांपुढे भीक मागितली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

दिल्लीत आज (रविवार, 23 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. इंडिया गेटवर बसवण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनही केलं. यावेळी त्यांनी नेताजींच्या देशप्रेमाबद्दल वक्तव्य करताना त्यांच्या कार्याला अभिवादनही केलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती असून त्यानिमित्त या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल देण्यात येणारा नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं आहे. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच नेताजींचा भव्य पुतळा उभारला जाईल, असं आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे नेताजींनी स्वातंत्र्यासाठी कधीच इंग्रजांपुढे भीक मागितली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

होलोग्राम पुतळा म्हणजे काय?

होलोग्राम हे एक प्रकारचं डिजिटल तंत्रज्ञान आहे. ते एका प्रोजेक्टरप्रमाणे काम करतं. या तंत्रज्ञानाचा वापर करुन थ्री डी आकृती तयार करता येते. या तंत्रज्ञानामुळे आभासी प्रतिकृती तयार होते. ही प्रतिकृती जिवंत पुतळ्यासारखी असल्याचाच भास होतो. होलोग्राम पुतळा हे आधुनिक तंत्रज्ञानानं साकारलेलं एक अद्भूत रसायन आहे.

Published on: Jan 23, 2022 07:58 PM