Badlapur Rail Roko : बदलापुरच्या चिमुकल्यांसाठी न्याय मागणं पडलं महागात, 40 जण अटकेत तर इतक्यांवर गुन्हे दाखल

| Updated on: Aug 21, 2024 | 11:51 AM

बदलापूरात आंदोलन करताना जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड करणे, पोलिसांवर दगडफेक करणे या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात काही गुन्हे तर काही ठाणे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

Follow us on

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आला. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला. याघटनेनंतर बदलापुरात एकच संतापाची लाट उसळली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्या… याच मागणीसाठी बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर जनआक्रोश पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने बदलापूरकर रेल्वे रूळावर उतरल्याने तब्बल १० तास रेल्वे ठप्प होत्या. दरम्यान, चिमुकल्यांच्या न्यायासाठी आंदोलन करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काहीना अटक करण्यात आली आहे. दोन हजारहून अधिक लोकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर सध्या ४० जणांना अटक कऱण्यात आलं असून त्यांना कोर्टात हजर करणार आहे. इतकंच नाहीतर राड्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भाषणाची देखील चौकशी केली जाणार आहे. बदलापुरातील आंदोलनाप्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर आले असून त्यांच्याकडून ही कारवाई कऱण्यात आली आहे.