Neelam Gorhe | वर्ध्याच्या आर्वी येथील अवैध गर्भपाताची घटना आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी : नीलम गोऱ्हे

| Updated on: Jan 13, 2022 | 4:46 PM

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिचा अवैधरित्या गर्भपात (Minor Girl Abortion) केल्याचं प्रकरण वर्धा जिल्ह्यात (Wardha) गाजत आहे. ज्या नामांकित रुग्णालयात 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात करण्यात आला, त्या इमारतीच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिचा अवैधरित्या गर्भपात (Minor Girl Abortion) केल्याचं प्रकरण वर्धा जिल्ह्यात (Wardha) गाजत आहे. ज्या नामांकित रुग्णालयात 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात करण्यात आला, त्या इमारतीच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी 11 कवट्या आणि 54 हाडं असे अवशेष सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. आता डॉक्टर रेखा कदम यांच्या सासू आणि परिचारिकेलाही ताब्यात घेतले आहे. पीडितेचा 30 हजार रुपयांत अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप डॉ. रेखा कदम यांच्यावर आहे. मात्र डॉ. कदम यांनी यापूर्वीही अनेक गैरप्रकार केल्याची चर्चा खरी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Published on: Jan 13, 2022 04:34 PM
Nitesh Rane | नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार
Nashik : नाशिकमध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर 11 संपकरी ST कर्मचाऱ्यांची सुटका