Ranveer Singh : आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणं भोवणार? अभिनेता रणवीर सिंगविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

| Updated on: Jul 25, 2022 | 10:15 PM

रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये अद्याप या FIR दाखल केलेला नाही. मात्र तक्रार दाखल झाल्याने आता हे न्यूड फोटोशूटचं प्रकरण रणवीर सिंगला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून सतत बातम्यांमध्ये झळकतो आहे. त्याच्यावरती काही लोकांकडून टिकेची झोड उडवण्यात आली आहे. तर काही लोक ती त्याची मर्जी म्हणत त्याच्या न्यूड फोटोशूटचं समर्थन करत आहेत. यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत असताना यात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये अद्याप या FIR दाखल केलेला नाही. मात्र तक्रार दाखल झाल्याने आता हे न्यूड फोटोशूटचं प्रकरण रणवीर सिंगला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरूनच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही रणवीर सिंगवर सरकून टीका केली होती.

 

Published on: Jul 25, 2022 10:15 PM
Special Report | शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कुणाचं पारडं जड?-tv9
घराणेशाहीवरुन शिवसेना आणि मनसेत जुंपली, संदीप देशपांडेंच्या टीकेला मनिषा कायंदेंचं प्रत्युत्तर