Tamhini Ghat | राज्यातील घाट रस्ते बंद, ताम्हिणी घाटात पोलीस बंदोबस्त; विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई
ताम्हिणी घाटात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. विनाकारण फिरणाऱ्या हौशी पर्यटकांवर पोलिस कारवाई करत आहेत.
जोरदार पावसामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्यातील घाट रस्ते सध्या बंद आहेत. ताम्हिणी घाटात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. विनाकारण फिरणाऱ्या हौशी पर्यटकांवर पोलिस कारवाई करत आहेत. पावसाळ्यात ताम्हिणी घाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदाही मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. त्यामुळे पुणे आणि परिसरातून ताम्हिणी घाटात जाणाऱ्यांची संख्याही जास्त असते. मात्र पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय.